स्थानिक झाडे म्हणजे काय?
एखाद्या प्रदेशात निसर्गत: आढळणाऱ्या वनस्पती म्हणजे स्थानिक वनस्पती. या स्थानिक वृक्ष-वल्लींवर आपले पशु-पक्षी, कृमी-किटके मुख्यत: आहार, आधार आणि निवारा यांसाठी विसंबून असतात. या वनस्पती स्थानिक पर्यावरणात (Ecosystem) एक महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा वनस्पती वाढवणे आणि जोपासणे म्हणजे एक प्रकारे आपल्या निसर्गाचे संवर्धन करणेच होय.
एक साधी लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे परदेशी झाडांवर आपले पक्षी-फुलपाखरे, मधमाश्या, सरपटणारे प्राणी, किटके इ. निर्वाह करू शकत नाहीत. कारण हि झाडे व त्यांची फुले, पाने, फांद्या, मुळे इ. सर्व या स्थानिक जीवांसाठी नवीन आहेत. उदा. गुलमोहर, कॉपरपॉड, निलगिरी, सुबाभूळ (याचे नाव तर 'कुबाभूळ' असायला हवे), रेन ट्री, जाकारंदा, ग्लिरिसीडीया, सिल्वर ओक इ. हि परदेशी झाडे असून भारतात काही दशकांपूर्वीच आली आहेत. याच काळात शहरे झपाट्याने वाढली आणि हिरवाई कमी होऊ लागली. परिणामी पशु-पक्ष्यांची संख्या पण झपाट्याने घटू लागली. कारण वेगाने बदलणारा अधिवास या जीवांना मानवला नाही. आज शहरांमध्ये मोठी-मोठी उद्याने व बगीचे आहेत. पण तिथे पक्षी घरटी करीत नाहीत, फुलपाखरांचे कोश दिसत नाहीत, सरडे आढळत नाहीत. कारण परदेशी झाडे जैविक अन्न-साखळीत प्रभावीपणे सहभागी होऊ शकत नाहीत. याउलट आपली स्थानिक झाडे हजारो वर्षांपासून या जीवांच्या मुलभूत गरजा पूर्ण करत आहेत. जैविक अन्न-साखळी किंवा अन्न-जाळे (Food-webs) हे निसर्ग व त्यातील जीव-जंतूच्या नाते-संबंधांचे प्रतिनिधित्व करते आणि पर्यावरणाच्या समतोलासाठी आवश्यक असते.
रहिवासी भागात म्हणजे शहरात पक्ष्यांची संख्या झपाट्याने खालावली आहे हे तर सर्वश्रुत आहेच. परंतु यासोबत फुलपाखरे, मधमाशा, किटके, बेडूक, सरडे इ. ची संख्या ही रोडावते आहे या वास्तवाकडे आपले बहुतांशी दुर्लक्ष होत आहे. हे सर्व एकाच पर्यावरणाचे घटक असून एकमेकांवर अवलंबून आहेत. उदा. स्थानिक झाड असेल तर त्या झाडाच्या फुला-फळांवर उपजीविका करणारी फुलपाखरे, कीटक तिथे येतील; कीटकांमुळे सरडे, बेडूक व त्या कीटकांना खाणारे कीटक येतील; आणि हे सर्व असले तर त्या झाडावर लहान-मोठे पक्षी येतील. हे अन्न-साखळीचे एक उदाहरण झाले. आपल्याला अशी अनेक उदाहरणे आपण डोळसपणे पाहिल्यास आढळतील. इथे मी मुद्दामून सांगू इच्छितो कि हे कीटक म्हणजे डास, झुरळे असे उपद्रवी कीटक नसून परागीभवनात मदत करणारे उपयोगी कीटक आहेत. किंबहुना यातील बरेच कीटक उपद्रवी कीटकांवर जगतात.
शहरांमध्येच नाही तर लहान खेडोपाड्यामध्ये सुद्धा परदेशी झाडांनी आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केलेली आहे. एक तर या वनस्पतींच्या बिया सहज रुजतात आणि दुसरे म्हणजे या वनस्पती पटकन पसरतात. उदा. सुबाभूळ, घाणेरी/ टणटणी इ. वनस्पती सर्वत्र अत्यंत झपाट्याने पसरत आहेत. आणि त्यांच्या वाढीला आळा घालणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. याचा एकत्रितरित्या परिणाम मूळ जंगलांवर होतो. परदेशी वनस्पती आपल्या मुळच्या जंगलांची आंतर-रचना बिघडवतात. तसेच आसपासच्या झाडांच्या वाढीवर ही विपरीत परिणाम करतात.
काहींचे याबद्दल दुमत असू शकते. काही तर या टोकापर्यंत जातात कि हि झाडे सुद्धा ऑक्सिजन देतात आणि लवकर वाढतात. अशा झाडांमुळे वाढते प्रदूषण आटोक्यात येऊ शकते. खरे आहे. पण जर तुमच्या इतक्याच अपेक्षा असतील तर गाजर गवत काय वाईट आहे मग?! कारण या गरजा गाजर गवत ही पूर्ण करू शकते. पण मग आपल्या पर्यावरणातील सजीव जातील कुठे??? या परदेशी वनस्पती आपल्या स्थानिक निसर्गातील सजीवांसाठी जवळ-जवळ प्लास्टिक सारखी भूमिका बजावतात.
हल्ली आपणा सर्वांना सगळे अगदी त्वरित आणि ताबडतोब हवे असते. झाडे सुद्धा हवीत फास्ट वाढणारी! परदेशी झाडे लावण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांची सहजासहजी होणारी उपलब्धता आणि पटकन मिळू शकणारी हिरवाई. मग ती निरुपयोगी किंवा नुकसानकारक असली तरी चालेल. पण आपण इथे हे विसरतो कि त्वरित मिळणारा फायदा भविष्यात आपले फार मोठे अनपेक्षित नुकसान करू शकतो. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे जी परदेशी झाडे आपण मोठ्या कौतुकाने लावतो ती लवकर वाढणारी असली तरी अल्पजीवी असतात. तसेच विविध आजारांना लवकर बळी पडणारी असतात. कारण एकच - ती आपल्या मातीतली नाहीत, स्थानिक नाहीत!!! आपली स्थानिक झाडे वाढीसाठी जरी प्रारंभी वेळ घेत असली, तरी ती दीर्घ-जीवी आणि रोग-प्रतिकारक आहेत. सोबत ती दु:ष्काळाला परिणामकारकरित्या तोंड देऊ शकतात.
तात्पर्य काय कि आपण आपल्या घर, व्यवसाय, ऑफिस, शाळा, कॉलेज इ. परिसरात शक्य तेथे फक्त स्थानिक झाडेच लावली आणि जगवली पाहिजेत. किंबहुना आपण परदेशी झाडे लावणे प्रामुख्याने टाळले पहिजे. कारण ही परदेशी झाडे आपल्या पशु-पक्ष्यांना, त्यांच्या अधिवासाला आणि क्वचित प्रसंगी आपल्याला सुद्धा कशी नुकसान पोहोचवू शकते हे आपण लक्षात घेत नाही.
विशेष म्हणजे असे नाही कि आपल्या मातीत रुजणारी झाडे बहुपयोगी नाहीत. परंतु त्याविषयी बहुसंख्य लोक अनभिज्ञ आहेत. आपण घरातल्या व्यक्तीस किंवा स्वत:सच विचारा - १० स्थानिक फुलणाऱ्या झाडांची नावे? सांगता येतात का?? आश्चर्य वाटेल परंतु भारतात जवळपास ४५००० वनस्पतींचा खजिना आहे. आणि त्यापैकी अंदाजे १५००० फुलणारी आहेत. महाराष्ट्रात यापैकी ४००० वनस्पती आहेत. आणि आपण हे सर्व विसरून, फक्त १५-२० परदेशी झाडांना प्राधान्य देवून आपल्याच निसर्गावर मर्यादा घालत आहोत. का व कशासाठी?
मी म्हणेन कि वृक्षारोपण करताना दुर-दृष्टी ठेवणे अधिक हितावह होईल…पर्यावरणाच्या , पशु-पक्ष्यांच्या आणि आपल्या भावी पिढीच्या हिताचे सुद्धा..! आपल्या परिसरात जर आपल्या मातीतली, स्थानिक झाडे लावलीत तर नाना प्रकारचे पक्षी आपल्या परिसरातच दिसतील. इतकेच नाही, तर आपल्या पर्यावरणाचा समतोल (Ecological Balance) ही शाबूत राहील. स्थानिक झाडांमध्ये बरीच सुंदर फुलणारी, फळे देणारी, सुवासिक, औषधी गुणधर्म असलेली बरीच बहुपयोगी झाडे आहेत. उदा. बहावा, पळस, तामण, भोकर, पांगारा इ. याविषयीची माहिती आपणांस विविध पुस्तके, इंटरनेट इ. माध्यमांतून मिळू शकते. तसेच आपण www.giftingtrees.blogspot.in या ब्लॉग ला ही भेट देवू शकतात. मी इथे विविध स्थानिक झाडांची फोटोसहीत माहिती अगदी सहज-सोप्या इंग्रजी भाषेत देण्याचा प्रयत्न केला आहे. परदेशी वनस्पतींचे तोटे आणि वृक्षरोपणाविषयी इतरही रंजक माहिती आपणास या ब्लॉग वर मिळू शकते.
आपण काय करू शकतो?
१) स्थानिक झाडांविषयी जाणीवपूर्वक ओळख करून घेणे व इतरांना ओळख करून देणे. तसेच कोणती झाडे आपल्या पर्यावरणास हानिकारक आहेत ते जाणून घेणे.
२) आपल्या परिसरात परदेशी झाडे लावणे अगत्याने टाळावे. कारण हल्ली झाडांसाठी, वृक्षारोपणासाठी फार कमी जागा शिल्लक राहते, विशेषत: शहरात. अशा वेळी त्या ठिकाणी जर परदेशी झाडे लावली तर आपले पक्षी कुठे जातील? हा विचार करणे.
३) आपल्या प्रिय व्यक्तीच्या नावाने एक तरी स्थानिक वृक्ष लावणे व वाढवणे. एखाद्या सुखद घटनेचा साक्षीदार म्हणून ही आपण झाडे लावू शकतात. दिवसेंदिवस वाढणारे ते झाड आपल्याला त्या सुखद घटनेची वर्षानुवर्षे आठवण करून देईल. उदा. लग्न, मुला/मुलीचा जन्मदिवस.
४) आपल्या परिसरातील एखादे निसर्गत: जगलेले स्थानिक झाड असल्यास त्याची काळजी घेणे .
५) स्थानिक झाडांची फुले-फळे केव्हा येतात? एखाद्या विशिष्ट झाडावर कोणकोणते पक्षी, फुलपाखरे व कीटक येतात? याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करणे. या सर्वांच्या नोंदी ठेऊन त्या इतरांसोबत वाटणे.
एखाद्या प्रदेशात निसर्गत: आढळणाऱ्या वनस्पती म्हणजे स्थानिक वनस्पती. या स्थानिक वृक्ष-वल्लींवर आपले पशु-पक्षी, कृमी-किटके मुख्यत: आहार, आधार आणि निवारा यांसाठी विसंबून असतात. या वनस्पती स्थानिक पर्यावरणात (Ecosystem) एक महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा वनस्पती वाढवणे आणि जोपासणे म्हणजे एक प्रकारे आपल्या निसर्गाचे संवर्धन करणेच होय.
एक साधी लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे परदेशी झाडांवर आपले पक्षी-फुलपाखरे, मधमाश्या, सरपटणारे प्राणी, किटके इ. निर्वाह करू शकत नाहीत. कारण हि झाडे व त्यांची फुले, पाने, फांद्या, मुळे इ. सर्व या स्थानिक जीवांसाठी नवीन आहेत. उदा. गुलमोहर, कॉपरपॉड, निलगिरी, सुबाभूळ (याचे नाव तर 'कुबाभूळ' असायला हवे), रेन ट्री, जाकारंदा, ग्लिरिसीडीया, सिल्वर ओक इ. हि परदेशी झाडे असून भारतात काही दशकांपूर्वीच आली आहेत. याच काळात शहरे झपाट्याने वाढली आणि हिरवाई कमी होऊ लागली. परिणामी पशु-पक्ष्यांची संख्या पण झपाट्याने घटू लागली. कारण वेगाने बदलणारा अधिवास या जीवांना मानवला नाही. आज शहरांमध्ये मोठी-मोठी उद्याने व बगीचे आहेत. पण तिथे पक्षी घरटी करीत नाहीत, फुलपाखरांचे कोश दिसत नाहीत, सरडे आढळत नाहीत. कारण परदेशी झाडे जैविक अन्न-साखळीत प्रभावीपणे सहभागी होऊ शकत नाहीत. याउलट आपली स्थानिक झाडे हजारो वर्षांपासून या जीवांच्या मुलभूत गरजा पूर्ण करत आहेत. जैविक अन्न-साखळी किंवा अन्न-जाळे (Food-webs) हे निसर्ग व त्यातील जीव-जंतूच्या नाते-संबंधांचे प्रतिनिधित्व करते आणि पर्यावरणाच्या समतोलासाठी आवश्यक असते.
रहिवासी भागात म्हणजे शहरात पक्ष्यांची संख्या झपाट्याने खालावली आहे हे तर सर्वश्रुत आहेच. परंतु यासोबत फुलपाखरे, मधमाशा, किटके, बेडूक, सरडे इ. ची संख्या ही रोडावते आहे या वास्तवाकडे आपले बहुतांशी दुर्लक्ष होत आहे. हे सर्व एकाच पर्यावरणाचे घटक असून एकमेकांवर अवलंबून आहेत. उदा. स्थानिक झाड असेल तर त्या झाडाच्या फुला-फळांवर उपजीविका करणारी फुलपाखरे, कीटक तिथे येतील; कीटकांमुळे सरडे, बेडूक व त्या कीटकांना खाणारे कीटक येतील; आणि हे सर्व असले तर त्या झाडावर लहान-मोठे पक्षी येतील. हे अन्न-साखळीचे एक उदाहरण झाले. आपल्याला अशी अनेक उदाहरणे आपण डोळसपणे पाहिल्यास आढळतील. इथे मी मुद्दामून सांगू इच्छितो कि हे कीटक म्हणजे डास, झुरळे असे उपद्रवी कीटक नसून परागीभवनात मदत करणारे उपयोगी कीटक आहेत. किंबहुना यातील बरेच कीटक उपद्रवी कीटकांवर जगतात.
शहरांमध्येच नाही तर लहान खेडोपाड्यामध्ये सुद्धा परदेशी झाडांनी आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केलेली आहे. एक तर या वनस्पतींच्या बिया सहज रुजतात आणि दुसरे म्हणजे या वनस्पती पटकन पसरतात. उदा. सुबाभूळ, घाणेरी/ टणटणी इ. वनस्पती सर्वत्र अत्यंत झपाट्याने पसरत आहेत. आणि त्यांच्या वाढीला आळा घालणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. याचा एकत्रितरित्या परिणाम मूळ जंगलांवर होतो. परदेशी वनस्पती आपल्या मुळच्या जंगलांची आंतर-रचना बिघडवतात. तसेच आसपासच्या झाडांच्या वाढीवर ही विपरीत परिणाम करतात.
काहींचे याबद्दल दुमत असू शकते. काही तर या टोकापर्यंत जातात कि हि झाडे सुद्धा ऑक्सिजन देतात आणि लवकर वाढतात. अशा झाडांमुळे वाढते प्रदूषण आटोक्यात येऊ शकते. खरे आहे. पण जर तुमच्या इतक्याच अपेक्षा असतील तर गाजर गवत काय वाईट आहे मग?! कारण या गरजा गाजर गवत ही पूर्ण करू शकते. पण मग आपल्या पर्यावरणातील सजीव जातील कुठे??? या परदेशी वनस्पती आपल्या स्थानिक निसर्गातील सजीवांसाठी जवळ-जवळ प्लास्टिक सारखी भूमिका बजावतात.
हल्ली आपणा सर्वांना सगळे अगदी त्वरित आणि ताबडतोब हवे असते. झाडे सुद्धा हवीत फास्ट वाढणारी! परदेशी झाडे लावण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांची सहजासहजी होणारी उपलब्धता आणि पटकन मिळू शकणारी हिरवाई. मग ती निरुपयोगी किंवा नुकसानकारक असली तरी चालेल. पण आपण इथे हे विसरतो कि त्वरित मिळणारा फायदा भविष्यात आपले फार मोठे अनपेक्षित नुकसान करू शकतो. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे जी परदेशी झाडे आपण मोठ्या कौतुकाने लावतो ती लवकर वाढणारी असली तरी अल्पजीवी असतात. तसेच विविध आजारांना लवकर बळी पडणारी असतात. कारण एकच - ती आपल्या मातीतली नाहीत, स्थानिक नाहीत!!! आपली स्थानिक झाडे वाढीसाठी जरी प्रारंभी वेळ घेत असली, तरी ती दीर्घ-जीवी आणि रोग-प्रतिकारक आहेत. सोबत ती दु:ष्काळाला परिणामकारकरित्या तोंड देऊ शकतात.
तात्पर्य काय कि आपण आपल्या घर, व्यवसाय, ऑफिस, शाळा, कॉलेज इ. परिसरात शक्य तेथे फक्त स्थानिक झाडेच लावली आणि जगवली पाहिजेत. किंबहुना आपण परदेशी झाडे लावणे प्रामुख्याने टाळले पहिजे. कारण ही परदेशी झाडे आपल्या पशु-पक्ष्यांना, त्यांच्या अधिवासाला आणि क्वचित प्रसंगी आपल्याला सुद्धा कशी नुकसान पोहोचवू शकते हे आपण लक्षात घेत नाही.
विशेष म्हणजे असे नाही कि आपल्या मातीत रुजणारी झाडे बहुपयोगी नाहीत. परंतु त्याविषयी बहुसंख्य लोक अनभिज्ञ आहेत. आपण घरातल्या व्यक्तीस किंवा स्वत:सच विचारा - १० स्थानिक फुलणाऱ्या झाडांची नावे? सांगता येतात का?? आश्चर्य वाटेल परंतु भारतात जवळपास ४५००० वनस्पतींचा खजिना आहे. आणि त्यापैकी अंदाजे १५००० फुलणारी आहेत. महाराष्ट्रात यापैकी ४००० वनस्पती आहेत. आणि आपण हे सर्व विसरून, फक्त १५-२० परदेशी झाडांना प्राधान्य देवून आपल्याच निसर्गावर मर्यादा घालत आहोत. का व कशासाठी?
आपण काय करू शकतो?
१) स्थानिक झाडांविषयी जाणीवपूर्वक ओळख करून घेणे व इतरांना ओळख करून देणे. तसेच कोणती झाडे आपल्या पर्यावरणास हानिकारक आहेत ते जाणून घेणे.
२) आपल्या परिसरात परदेशी झाडे लावणे अगत्याने टाळावे. कारण हल्ली झाडांसाठी, वृक्षारोपणासाठी फार कमी जागा शिल्लक राहते, विशेषत: शहरात. अशा वेळी त्या ठिकाणी जर परदेशी झाडे लावली तर आपले पक्षी कुठे जातील? हा विचार करणे.
३) आपल्या प्रिय व्यक्तीच्या नावाने एक तरी स्थानिक वृक्ष लावणे व वाढवणे. एखाद्या सुखद घटनेचा साक्षीदार म्हणून ही आपण झाडे लावू शकतात. दिवसेंदिवस वाढणारे ते झाड आपल्याला त्या सुखद घटनेची वर्षानुवर्षे आठवण करून देईल. उदा. लग्न, मुला/मुलीचा जन्मदिवस.
४) आपल्या परिसरातील एखादे निसर्गत: जगलेले स्थानिक झाड असल्यास त्याची काळजी घेणे .
५) स्थानिक झाडांची फुले-फळे केव्हा येतात? एखाद्या विशिष्ट झाडावर कोणकोणते पक्षी, फुलपाखरे व कीटक येतात? याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करणे. या सर्वांच्या नोंदी ठेऊन त्या इतरांसोबत वाटणे.

No comments:
Post a Comment