Monday, September 5, 2011
Monday, February 14, 2011
कर्म
सांयकाळी समुद्रकाठी फिरताना एक वृद्धानं एका लहानग्याला किनार्यावर काहीतरी उचलून समुद्रात फेकताना पाहिलं.
न राहावून त्यानं त्या लहानग्याला विचारलं;
"समुद्रकिनारी इतके हजारो मासे आहेत, तु कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस ?
आणि मुठभर मासे वाचवून जगाला असा काय फरक पडणार आहे ?"
त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं,
"यानं जगाला काय फरक पडेल ते मला माहीत नाही. पण या माशाला विचारा, त्याला काय फरक पडला ? ज्याचा मी नुकताच जीव वाचवला."
विचार करा...
जर आता नाही तर केव्हा? जर तुम्ही नाही तर मग कोण???
Subscribe to:
Posts (Atom)

